बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्या एकत्र आल्या की सिनेमा हीटच होणार हे समिकरण ठरलेलं आहे. अशा जोडींमधलं अग्रणी नाव म्हणजे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ. पण तुम्हाला माहित आहे का अक्षयच्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या सिनेमात ही जोडी पाहायला मिळणार नाही. या सिनेमासाठी अक्षयने कतरिनाला वगळून परिणीतीला पसंती दिली आहे. नमस्ते इंग्लंड हा नमस्ते लंडन सिनेमाचा रिमेक आहे. पहिल्या भागात अक्षय आणि कतरिनाने एकत्र काम केले होते.

पोरगी पास होण्याचं सुख काय असतं ते भाऊ कदमला विचारा

अक्षय आणि कतरिनाने पहिल्यांदा हमको दीवाना कर गए या सिनेमात एकत्र काम केले होते. या दोघांच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्रीची प्रशंसाही झाली होती. या सिनेमानंतर वर्षभरात अक्षय आणि कतरिनाचा एखादा तरी सिनेमा बॉक्स ऑफिसवर यायचा. त्यांचे काही सिनेमे चालले तर काही फ्लॉप ठरले. कदाचीत याच कारणामुळे कतरिनाने अक्षयसोबत नंतर काम करणं सोडलं.

पण गेल्या काही वर्षांपासून अक्षयचा प्रत्येक सिनेमा चालतो आहे. बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्यांमध्ये अक्षयच नाव हमखास घेण्यात येते. त्यामुळे आता अक्षयच्या हातात अभिनेत्रींची निवड आल्यावर त्याने कतरिनाला पसंती न देता परिणीतीला निवडले.
परिणीती एक हरहुन्नरी अभिनेत्री

स्वतःवरचेच व्हायरल जोक्स जेव्हा रिंकू वाचते…

याबाबतीत अक्षयला विचारले असता तो म्हणाला की, मी परिणीतीसोबत आतापर्यंत काम केले नाही. ती एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. पण कतरिनाला नकार देण्याचं फक्त हेच एक कारण आहे की दुसरं काही हे आता त्याचे त्यालाच माहित. पण अक्षय- परिणीतीची जोडी बॉक्स ऑफिसवर हिट होईल की नाही हे तर येणारा काळच सांगू शकेल. सध्या अक्षय कुमार त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तर दुसरीकडे ‘पॅडमॅन’ या सिनेमाचे तो चित्रीकरणही करत आहे.