बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा स्वच्छ भारत अभियानवर आधारित असलेला ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ चित्रपट सर्वत्र काल प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. श्री नारायण सिंह याच्या दिग्दर्शनात चित्रीत करण्यात आलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी १३.१० कोटी रुपये इतकी कमाई केलीय.

वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींच्या बॅगची किंमत कळल्यावर तुम्हालाही बसेल धक्का!

आपल्या चित्रपटांप्रती जागरुक राहणारा अक्षय चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी चक्क दिग्दर्शकावरच रागावला होता. याचा खुलासा स्वतः सिंह यानेच एका मुलाखती दरम्यान केला. चित्रीकरणावेळी झालेल्या एका घटनेमुळे अक्षयला प्रचंड राग आला होता. याविषयी श्री नारायण म्हणाला की, आम्ही चित्रीकरणासाठी दिल्लीहून मथुरेला जात होतो. त्यावेळी अक्षय दुसऱ्याच रस्त्याने आल्याने तो सहा तासांनंतर सेटवर पोहचला. बाकीची टीमसह आम्ही लोक अडीच तासातच लोकेशनवर पोहचलेलो. यावरूनच अक्षय मला ओरडला होता. मला तुम्ही योग्य मार्ग का दाखवला नाही? असे म्हणत तो चिडला.

वाचा : ‘बिग बॉस ११’ मध्ये येण्यासाठी या हॉट अभिनेत्रीला चक्क २ कोटींची ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टॉयलेट: एक प्रेम कथा’च्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाची जीभ कापणाऱ्याला तब्बल एक कोटी रुपयाचे बक्षिस जाहीर करण्यात आलेले. याविषयी सिंह म्हणाला की, मथुरा येथे चित्रीकरण करत असताना काही लोकांनी त्यास निषेध केला. आपल्या संस्कृतीबद्दल चुकीची माहिती या चित्रपटातून दिली जाणार असल्याचा त्यांचा गैरसमज झाला होता. त्यामुळेच त्यांनी माझी जीभ कापणाऱ्याला एक कोटीचे बक्षीस जाहीर केलेले. पण काही दिवसांनी चित्रीकरण सुरु झाल्यावर त्यांना चित्रपटाच्या कथेचा अंदाज आला.