07 March 2021

News Flash

‘मनसे’समोर अक्षय कुमारची माघार

इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी करायचं काय?" असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला.

अभिनेता अक्षय कुमारने त्याचा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्हमधून त्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतल्याचे जाहीर केले.

“मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी आतापर्यंत आंदोलन करत आलो. आता तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. १५ ऑगस्टला अक्षय कुमार यांचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा जगामध्ये हिंदीत प्रदर्शित होत आहे, तो महाराष्ट्रात हिंदीसह मराठीतही प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेतील ‘मिशन मंगल’ला आमचा विरोध नाही, पण मराठीत डब करण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे. इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी करायचं काय?” असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला.” इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मनचिकसे मोठं आंदोलन उभं करेल. सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील. चित्रपटगृहांच्या मालकांनाही ते परवडणार नाही.’मिशन मंगल’ हा चित्रपट मराठीत डब करण्यापेक्षा कलाकारांसोबत रिशूट करा. त्याला आमचा विरोध नाही. आमचा केवळ मराठीत डब करून रिलीज करायला विरोध आहे. जर ‘मिशन मंगल’ मराठीत डब करून हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला, तर हिंदी चित्रपटही रिलीज होऊ देणार नाही,” असे खोपकर यांनी फेसबुक लाइव्हद्वारे स्पष्ट केले.

खोपकर यांनी मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित करण्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमारने आपला निर्णय बदलला. मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित होणार नसल्याचे त्याने जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 2:14 pm

Web Title: akshay kumar steps back after mns opposed mission mangal dubbing in marathi ssv 92
Next Stories
1 पुन्हा एकदा शेफ पराग कान्हेरे प्रेक्षकांच्या भेटीला
2 सिद्धार्थ मल्होत्राची त्या तिघींना डेट करण्याची इच्छा
3 तिसऱ्या व्यक्तीमुळे पतीपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर दिया मिर्झाचा खुलासा
Just Now!
X