डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘Into The Wild’ हा शो अतिशय लोकप्रिय आहे. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावली. शोमध्ये अक्षयने करिअर आणि आयुष्यातील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान त्याने ५ मिनिटात ३ चित्रपट मिळाल्याचे सांगितले.

बेअर ग्रिल्सने शोमध्ये अक्षयला अभिनेता होण्याचा निर्णय कसा घेतलास आणि का घेतला असा प्रश्न विचारला होता. त्यावर अक्षयने ‘मी लहान मुलांना मार्शल आर्ट्स शिकवायचो. तेव्हा माझ्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी मला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. मी एका स्टूडिओमध्ये गेलो आणि तेथे एक मुलगी बसली होती. आम्ही दोघांनी एकत्र फोटो काढले. त्यानंतर मला २१ हजार रुपयांचा चेक मिळाला’ असे म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘तो चेक मिळाण्यानंतर मी खूप खूश होतो. तेव्हा मी विचार केला जेव्हा मी मार्शल आर्ट्स शिकवतो तेव्हा मला फक्त ५ हजार रुपये मिळतात आणि हे मोजकेच फोटो काढले तर मला इतके पैसे मिळाले. मला यामध्येच पुढे करिअर करायचे असे मी ठरवले होते. पण मी मॉडलिंग फार काळ केले नाही. मी एक दिवस नटराज स्टूडिओमध्ये गेलो. तेथे मला एक व्यक्ती भेटली. त्यांनी मला तुला अभिनेता व्हायचे आहे का असे विचारले?’

आणखी वाचा- अक्षयला मानलं! खिलाडी कुमार नावामागचा अर्थ समजला- बेअर ग्रिल्स

‘त्यावर मी हो म्हणालो. त्यांनी माझी ओळख दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांच्याशी करुन दिली. त्यांनी माझ्याकडून ५ मिनिटांत ३ चित्रपट साईन करुन घेतले. पण तिन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर चौथ्या चित्रपटाने थोडी फार कमाई केली. त्यानंतर हळूहळू माझे चित्रपट कमाई करु लागले आणि मी इथपर्यंत पोहोचलो’ असे अक्षय पुढे म्हणाला.