अभिनेत्री आलिया भट्ट व अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची पत्रिकासुद्धा व्हायरल होत आहे. या लग्नपत्रिकेवर २२ जानेवारी २०२० अशी लग्नाची तारीख लिहिण्यात आली आहे. या व्हायरल पत्रिकेबाबत आलियाला प्रश्न विचारला आला. मुंबई विमानतळावर आलियाला पाहिलं गेलं आणि त्यावेळी काही पत्रकारांनी तिच्या कथित लग्नाच्या तारखेविषयी विचारलं. हा प्रश्न ऐकून ती जोरात हसली. ‘हे खरंच आहे का’, असं विचारल्यावर मात्र तिने नकारार्थी इशारा केला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रिकेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाची आई सोनी राजदान म्हणाल्या, ”अशा वृत्तांना मी गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी देऊ इच्छित नाही.” या पत्रिकेत काही चुकासुद्धा होत्या. यात आलियाच्या वडिलांचं नाव मुकेश भट्ट असं लिहिलं आहे. पण तिचे वडील महेश भट्ट आहेत.

https://www.instagram.com/p/B36S7Iznmwy/

आणखी वाचा : ‘अग्गंबाई सासूबाई’मधल्या विश्वासचं ‘तुला पाहते रे’ कनेक्शन माहितीये का?

आलियाचे काका मुकेश भट्ट यांना लग्नाबाबतचे वृत्त विचारल्यास त्यांनी ते फेटाळले. ”आलिया सध्या उटीमध्ये ‘सडक २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मला देशभरातून फोनकॉल्स येत आहेत. हे खरं कसं असू शकतं? तिच्या लग्नाचं वृत्त खोटं आहे आणि ती पत्रिकासुद्धा. त्या पत्रिकेत बऱ्याच चुका आहेत”, असं त्यांनी सांगितलं.