24 February 2021

News Flash

‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलिया पुन्हा करणार संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम?

याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘गंगूबाई काठियावाडी’ असे असून या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटानंतर आलिया संजयलीला भन्साळी यांच्यासोबत आणखी एका चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलियाने जबरदस्त अभिनय केला आहे. या चित्रपटात आलियाने ज्या प्रकारे भाषा वापरली आहे तशी भाषा तिने तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच वापरली आहे. तसेच बॉलिवूड हंगामाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी आलियाने विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी आणि आलिया पुन्हा एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटलं आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरातच वेश्या व्यवसाय करत असताना गंगूबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधली. आपल्या या बहिणीला मग करीम लालाने अवघा कामाठीपुराच हातात दिला, असे सांगितले जाते. गंगूबाईंनी हा व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नाही. उलट, मुंबईतून वेश्या व्यवसायच काढून टाकण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाचे नेतृत्वही गंगूबाईंनी केले होते. अशा गंगूबाईंची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 6:58 pm

Web Title: alia bhatt to work in another project with sanjay leela bhansali avb 95
Next Stories
1 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून नायरा घेणार एक्झिट?
2 किचन वर्सेस लिव्हींग रूम; नेहाने शेअर केली घरातील रिअ‍ॅलिटी
3 ‘श्रीकांत मिशन के पिछे, और विलेन..’ ; ‘फॅमेली मॅन 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
Just Now!
X