चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ‘स्टूडंट ऑफ दी इयर’ या चित्रपटातून अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट हे दोन नवे चेहरे बॉलिवूडला दिले. या दोघांनी आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. करण जोहरच्या आगामी ‘कलंक’ चित्रपटातही ते एकत्र झळकणार असून या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. त्यातच आलियाचा सेटवरील एक फोटो व्हायरल झाला आहे.
करणच्या ‘कलंक’ मध्ये आलिया एक महत्वपूर्ण भूमिका करणार आहे. यावेळी सेटवरील आलियाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये आलियाने नव्या नवरीप्रमाणे साजशृंगार केला आहे. आलियाने लाल रंगाचा लेहंगा घातला असून दोन्ही हातात कलीरे बांधले आहेत. तर पारंपरिक पद्धतीने लाल रंगाची ओढणी घेतली आहे. त्यामुळे सध्या तिचा हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी सेटवरुन ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा फोटोही असाच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये माधुरी एका क्रेनवर उभी होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्यावर डिजाइनर झुमकेही घातले होते. या चित्रपटात माधुरीची महत्वपूर्ण भूमिका असून ती एका वेश्येच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचं चित्रीकरण १८ नोव्हेंबरला पूर्ण झालं असून ही माहिती आलिया, वरुणने सोशल मिडियावर दिली होती. हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं कथानक १९४० च्या दशकातलं आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा ‘कलंक’ या बिग बजेट चित्रपटामध्ये कलाकारांची तगडी फौज असल्याचं पहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त हे स्टारकास्ट झळकून येणार आहेत. विशेष म्हणजे ब-याच काळानंतर माधुरी आणि संजय दत्त एकत्र काम करणार असल्यामुळे या दोघांची चित्रपटातील केमिस्टी पहायला चाहते उत्सुक असल्याचं दिसून येतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 9:29 am