News Flash

हाय रे जुदाई…आलिया मिस करतेय रणबीरला!

रणबीर कपूर करोनाबाधित असून सध्या तो विलगीकरणात आहे.

अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या अफेअरबद्दल कोणाला माहित नाही? रणबीरला काही दिवसांपूर्वीच करोना संसर्ग झाला आहे आणि त्यामुळे तो गृहविलगीकरणात आहे. त्यामुळे आलिया त्याला खूपच मिस करत आहे असं दिसत आहे.

नुकतंच आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत या दोघांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले आहेत. हा त्यांचा जुना फोटो आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिलं आहे. “मेजर मिसिंग” आणि एक लाल बदाम यासह तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)


रणबीर सध्या करोनाबाधित असल्यानं गृहविलगीकरणात आहे. तर आलियाचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिने काल आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच तिने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. ती म्हणते, “मी तुमचे काळजीचे आणि विचारपूस करणारे मेसेज वाचत आहे. माझा करोना अहवाल निगेटिव्ह आला असून काही दिवस विलगीकरणात राहिल्यावर आणि माझ्या डॉक्टरांना विचारून मी आता उद्यापासून कामाला सुरुवात करत आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मी माझी काळजी घेत आहे आणि सुरक्षित आहे. तुम्हीही तुमची काळजी घ्या.” या सोबतच तिने चाहत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहनही केलं आहे.

रणबीर आणि आलिया तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. लवकरच ते दोघे ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात एकत्र पाहायला मिळतील. याशिवाय रणबीर ‘शमशेरा’ आणि ‘ऍनिमल’ या चित्रपटांमध्ये दिसेल तर आलिया ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि राजामौलीच्या ‘आर आर आर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 1:46 pm

Web Title: alia missing ranbir kapoor shared a photo on instagram vsk 98
Next Stories
1 ‘आई मी तुला म्हातारी होऊच देणार नाही…’, अंशुमन विचारेच्या मुलीचा व्हिडीओ चर्चेत
2 ‘पठाण’च्या सेटवरील शाहरुखचे व्हिडीओ लीक, किंग खानचे स्टंट व्हायरल
3 ‘रुही’ने केली कोटीत कमाई; तेही पहिल्याच दिवशी!
Just Now!
X