News Flash

शशांक केतकरची झालीय गोची!

प्रत्येक आईला तिचा मुलगा अगदी ‘श्री’ प्रमाणेच असावा असे वाटू लागले.

शशांकने ऑस्ट्रेलियात जाऊन एमईएम (मास्टर ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट) देखील केलं आहे.

छोट्या पडद्यामुळे घराघरांत पोहोचलेला, नुसता घरातच नाही तर कित्येकांच्या मनात जागा मिळवणारा ‘श्री’ ऊर्फ शशांक केतकर म्हणजेच ‘आताचा इथेच टाका तंबू’मधील ‘कपिल’ हा केवळ कलाकारच नाही तर तो एक लेखक, कवी आणि राष्ट्रीय स्तरावरचा स्वीमरही आहे. इंजिनीअर असलेल्या शशांकने ऑस्ट्रेलियात जाऊन एमईएम (मास्टर ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट) देखील केलं आहे. अशा या चतुरस्र अभिनेत्याची वेळेची फारच गोची झालीय. सध्या त्याची इथेच टाका तंबू ही झी युवावरील मालिका लोकप्रिय होतेय. त्यात सध्या गौरी आणि कपिलचा रोमॅण्टिक प्रपोज सीन अत्यंत गाजतोय. पण सध्या शशांक वेळे अभावी फारच त्रासात आहे. म्हणजेच इथेच टाका तंबू या मालिकेची शूटिंग, त्याचं सध्या रंगभूमीवर सुरु असलेलं नाटक, पुढे सुरु होणाऱ्या सिनेमांचं रिडींग आणि ” आईच्या गावात ” या वेगळ्या धाटणीचं सुरु केलेलं हॉटेल आणि त्याचं फिटनेस, या सर्वांतून तो अष्टपैलू बनून त्याच्या ” कामाच्या डेट्स ” सांभाळत त्याला आता खरंच असं वाटत असेल की कुठे कुठे टाकू तंबू ?

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून ‘श्री’ची भूमिका साकारत अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांच्या मनात कायमस्वरुपी जागा मिळवली आहे. त्याने रंगवललेले ‘श्री’चे पात्र प्रेक्षकांना इतके भावले की, प्रत्येक आईला तिचा मुलगा अगदी ‘श्री’ प्रमाणेच असावा असे वाटू लागले. प्रेक्षकांच्या मनात जागा बनवल्यानंतर सर्वांच्याच लाडक्या शशांक केतकरने प्रेक्षकांच्या पोटातही जागा बनवण्याचे ठरवले आहे. अभिनेता म्हणून नावारुपास आलेल्या शशांकने पुण्यात एक हॉटेल सुरु केले आहे. याबाबतच लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना शशांकने त्याच्या शब्दांतून सफर घडवली आहे ‘आईच्या गावात’ची. लहानपणापासूनच मला जेवणाची आणि एकंदर जेवणाशी निगडीत विविध गोष्टींची आवड होती. घरात आईच्या जेवणात काही बदल झाला तरीही ते मी लगेचच ओळखायचो. माझी हीच आवड आणि एकंदर माझ्या आईवडिलांनी दिलेले संस्कार यांमुळे मी एक हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच मी ‘आईच्या गावात’ची सुरूवात केली.

‘आईच्या गावात’ हे एक अस्सल मराठी पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळणारं हॉटेल आहे. दडपे पोहे, मेथीचे आणि विविध प्रकारचे (महाराष्ट्रीयन चवीचे) पराठे, थालीपीठ असे सर्व पदार्थ इथे तुम्हाला खायला मिळतील. कॉलेजिअन्सना लागलेली जंक फूडची सवय घालवण्यासाठी ‘आईच्या गावात’ वडापाव मिळत नाही ही लक्षात घेण्याची बाब. वडापाव मिळत नसला तरीही मोबाईलच्या चार्जिंगच्या सुविधेपासून ते अगदी वायफायपर्यंत सर्वच महत्त्वाच्या सेवाही या हॉटेलमध्ये पुरविण्यात येत आहेत. ‘आईच्या गावात’मधील माझा आवडता पदार्थ म्हणाल तर इथली मिसळ मला फार आवडते आणि जर मी अतिशय घाईत असेन तर मग दडप्या पोह्यांचा पर्याय आहेच. अशा या आमच्या ‘आईच्या गावात’ आईच्या हातच्या चवीची अनुभूती देणारे पदार्थ आम्ही सर्व्ह करतो. मला जेव्हा जेव्हा सुट्टी असेल किंवा माझ्या कामातून वेळ मिळेल तेव्हा मी ‘आईच्या गावात’ जाण्याला प्राधान्य देतो. कारण मी याला माझी जबाबदारी समजतो. मी ‘आईच्या गावात’ असताना एक अभिनेता म्हणून कधीच वावरत नाही. पण, मी तिथे असल्यावर होणारी गर्दी, काढले जाणारे सेल्फी या साऱ्या गोष्टी मला फार आनंद देऊन जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 8:36 am

Web Title: all rounder shashank ketkar
Next Stories
1 अभिनेत्री लिझाला चित्रपटातून शेअर करायचायं ‘कॅन्सर’चा लढा
2 फ्लॅशबॅक : दिलीपकुमार दिग्दर्शित पण प्रदर्शित न झालेला ‘कलिंगा’
3 ब्रॅड पीटची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली
Just Now!
X