News Flash

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मधील सईला मिळणार जबरदस्त धक्का

काय होणार जाणून घ्या?

पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत पाहायला मिळते. पण आता दिवळीत या मालिकेत एक वेगळे येणार आहे.

परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या नचिकेत आणि सई या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंघाने मालिकेची कथा उलगडताना दिसते. आजी आणि अप्पांच्या लग्नानंतर आता मालिकेत दिवाळीची लगबग पाहायला मिळतेय.

सध्या मालिकेत दिवाळी साजरी करतानाच सईला नचिकेत परत ऑस्ट्रेलियाला जाण्याचा विचार करत असल्याचे समजते. अचानक मिळालेल्या या धक्क्याने सई हादरून जाते. नचिकेत लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे समजताच सईची काय प्रतिक्रिया असेल? हा धक्का ती कशी सहन करणार? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 5:38 pm

Web Title: almost sufal sampurnam serial on new mode avb 95
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालसह गर्लफ्रेंडचीही होणार चौकशी; NCBने बजावलं समन्स
2 कर्जतचा वडापाव खाण्यासाठी शिल्पा शेट्टीने थांबवली गाडी; पाहा व्हिडीओ
3 “अर्णबला भारतात भीती वाटत असेल तर त्याने पाकिस्तानमध्ये जावे”, अभिनेत्याचे ट्विट चर्चेत
Just Now!
X