कॉलेज गोईंग मित्रांची धमाल कथा असलेल्या ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर रोहित पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी दिसणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, आम्ही बेफिकीर हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
खूप काही मिळवण्याच्या प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळेच चित्रपटाचा लुकही यूथफुल असल्याचं टीझरमधून पहायला मिळतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 5:45 pm