28 September 2020

News Flash

आमिर खानच्या आईचा करोना रिपोर्ट आला, अभिनेत्यानं टि्वटरवर दिली माहिती

यापूर्वी त्याने त्याची आणि इतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे सांगितले होते

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या काही कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झालेल्या समोर आले होते. खुद्द आमिरने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्याने त्याची आणि इतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे म्हटले होते. तसेच त्याने आईला करोना चाचणीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले होते. आता आमिरच्या आईचे करोना चाचणीचे अहवाल आले आहेत.

आमिर खानने आईच्या करोना चाचणीचे अहवाल ट्विटरद्वारे सांगितले आहेत. ‘मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या आईची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार’ असे आमिरने ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधी आमिरने फेसबुकवर पोस्ट करत काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. माझ्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आले असून महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. करोना बाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगर पालिकेचे आभार मानतो. तसेच माझी आणि उलेल्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. ती निगेटीव्ह आली. आता मी माझ्या आईला करोना चाचणी करण्यासाठी घेऊन जात आहे. तिचा रिपोर्ट देखील निगेटीव्ह येऊ देत अशी मी प्रार्थना करतो असे आमिरने पोस्टमध्ये होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 2:15 pm

Web Title: amir khan mother corona test report avb 95
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजना सांघीच्या नऊ तासांच्या चौकशीतून समोर आल्या ‘या’ गोष्टी
2 मला रडूच आलं हा व्हिडीओ बघून… सोनाली कुलकर्णी झाली भावूक
3 सोशल मीडियावर ‘या’ व्यक्तीच्या आक्षेपार्ह कमेंटमुळे अभिनेत्रीने दिली आत्महत्येची धमकी
Just Now!
X