News Flash

‘श्रीगणेश’ फेम अभिनेते जगेश मुकाटी काळाच्या पडद्याआड

ते गेल्या तीन-चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते.

अभिनेते जगेश मुकाटी

‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका व ‘हसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते जगेश मुकाटी यांचे निधन झाले. १० जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, ते गेल्या तीन-चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. बुधवारी त्यांना श्वास घेताना खूप त्रास जाणवला. अखेर दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. जगेश यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. हिंदी मालिकांमध्ये काम करणारे जगेश हे गुजराती नाटकांसाठीही प्रसिद्ध होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेत्री अंबिका रांजणकरने जगेश यांच्यासोबत काम केलं होतं. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट लिहित जगेश यांना श्रद्धांजली वाहिली. ‘खूपच दयाळू, साथ देणारे आणि कमालीची विनोदबुद्धी असणारे व्यक्तीमत्त्व.. खूप लवकर आम्हाला सोडून गेले.. तुमची खूप आठवण येईल’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबत जगेश यांच्यासोबतचा एक फोटोसुद्धा अंबिकाने पोस्ट केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कलाविश्वात अनेक वाईट बातम्या आल्या. इरफान खान, ऋषी कपूर, संगीतकार वाजिद खान, प्रेक्षा मेहता, मनमीत ग्रेवाल, चिरंजीवी सर्जा या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 9:11 am

Web Title: amita ka amit actor jagesh mukati passes away ssv 92
Next Stories
1 करोना रुग्ण आढळल्यानंतर मलायका अरोराची इमारत सील
2 चित्र रंजन : वाईटातून चांगल्याची अनुभूती..!
3 नमस्ते देवियो और सज्जनो… ‘गुगल मॅप’वर आता अमिताभ सांगणार रस्ता
Just Now!
X