बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे इंडस्ट्रीमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत जे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतात. बऱ्याचदा दे चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देताना दिसतात. पण अमिताभ यांनी नुकताच फोटो शेअर करत स्वत:लाच ट्रोल केले असल्याचे म्हटले जात आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. हा फोटो अमिताभ यांच्या तरुणपणीचा असल्याचे पाहायला मिळते. फोटोमध्ये त्यांनी मोठा शर्ट आणि बेल बॉटम पँट परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी मजेशीर कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
अमिताभ यांनी फोटो शेअर करत ‘एकेकाळी बेल बॉटम असणाऱ्या पँटच नाही तर शर्टसुद्धा घालायची स्टाइल होती..’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. तसेच त्यांनी हसण्याचे इमोजी देखील वापरले आहेत. बिग बींनी दिलेले कॅप्शन पाहून त्यांनी स्वत:लाच ट्रोल केले आहे असे म्हटले जात आहे.
आणखी वाचा- ‘बिग बींमुळे नैराश्यात गेलो होतो’; सुदेश भोसले यांनी सांगितला करिअरमधील रंजक किस्सा
सध्या अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती १२चे सूत्रसंचालन करत आहेत. तसेच ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘चेहरे’ हे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.