21 September 2020

News Flash

“मी चुकलो,” अमिताभ यांनी मागितली लेखकाची माफी; जाणून घ्या कारण…

त्या चूकीसाठी बिग बींनी मागितली जाहिर माफी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओ, ट्विट्स अशा विविध माध्यमातून ते आपले विचार व्यक्त करत असतात. मात्र यावेळी बिग बी प्रसिद्ध कवी, लेखक प्रसून जोशी यांच्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे चक्क प्रसून जोशींची माफी मागितली आहे. या माफीमागचं कारण वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल…

अवश्य पाहा – ‘या’ महिन्यात येणार करोना लस; चेतन भगत यांनी केली भविष्यवाणी

का मागितली बिग बींनी माफी?

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन सध्या नानावटी रुग्णालयात करोनावर उपचार घेत आहे. त्याला प्रोत्साहित करण्यासाठी बिग बींनी एक प्रेरणादायी कविता पोस्ट केली होती. या कवितेचं क्रेडिट त्यांनी आपले वडिल हरिवंश राय बच्चन यांना दिलं होतं. वास्तविक ही कविता प्रसून जोशी यांनी लिहिली होती. बिग बींनी चुकून कवितेचं क्रेडिट प्रसून जोशींऐवजी आपल्या वडिलांना दिलं होतं. या चूकीसाठी बिग बींनी माफी मागितली आहे.

“काल पोस्ट केलेली कविता बापूजींची नव्हती. प्रसुन जोशी यांची होती. या चूकीसाठी मी त्यांची माफी मागतो.” अशा आशयाचं ट्विट करुन बिग बींनी माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 4:23 pm

Web Title: amitabh bachchan prasoon joshi poem harivansh rai bachchan mppg 94
Next Stories
1 …अशी झाली ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूर यांची एण्ट्री; अनुभव सिन्हांनी दिला आठवणींना उजाळा
2 ‘या’ महिन्यात येणार करोना लस; चेतन भगत यांनी केली भविष्यवाणी
3 ‘मसुटा’ मधून उलगडणार शिक्षणासाठी झटणाऱ्या कुटुंबाची कथा!
Just Now!
X