30 October 2020

News Flash

संपत्तीविषयी बिग बींनी घेतला महत्वाचा निर्णय, करणार ‘या’ व्यक्तींच्या नावावर

बिग बींची एकंदरीत संपत्ती ३६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे

अमिताभ बच्चन

अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी आणि संपत्ती मिळविलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. आज अभिनयामुळे विशेष ओळखले जाणारे बिग बी अनेक वेळा त्यांच्या लक्झरी लाईफ आणि संपत्तीमुळेही चर्चेले जातात. जवळपास २०० चित्रपट करणारे बिग बी यांनी आजवर अमाप संपत्ती कमावली आहे. त्यामुळे उतरत्या वयामध्ये ते ही संपत्ती कोणाच्या नावावर करणार असा प्रश्न अनेक वेळा चाहत्यांना पडतो. सध्या बिग बी छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून या सेटवर त्यांनी संपत्ती कोणाच्या नावावर करणार हे जाहीर केलं आहे.

काही दिवसापूर्वी ‘केबीसी’च्या सेटवर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्याशी बोलताना बिग बींनी त्यांची अमाप संपत्ती कोणत्या व्यक्तीच्या नावावर करणार हे जाहीर केलं.

‘केबीसी’च्या सेटवर सिंधुताईंनी त्यांच्या आश्रमामधील मुलींविषयी, समाजामध्ये मुलींना भेडसावणाऱ्या गोष्टींवर चर्चा केली. यावर बिग बींनीदेखील मुलींना मुलांप्रमाणेच समान हक्क दिला पाहिजे असं सांगत, “माझी संपत्ती मी माझ्या दोन्ही मुलांना समसमान वाटून देणार आहे, असं सांगितलं.
अनेक वेळा मी सांगितलं आहे आणि आज पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मी माझी जी काही थोडीफार संपत्ती आहे ती माझ्या दोन्ही मुलांनी देणार आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. या दोघांमध्ये मी संपत्तीचे समान वाटण्या करणार आहे. दोन्ही मुलांना समसमान संपत्ती मिळाली पाहिजे. मग काही असो”, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

वाचा : Video : ‘दीपिकाला पाहून मला उलटी येते’, पाकिस्तानी निवेदक बरळला

सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बींची एकंदरीत संपत्ती ३६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यासोबत त्यांचे ‘जलसा’ आणि ‘प्रतीक्षा’ हे दोन बंगले असून र्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्श, लेक्सस, फॅन्टम अशा अनेक गाड्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 8:16 am

Web Title: amitabh bachchan property will equally divided between abhishek shweta bachchan kbc ssj 93
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे सारा-कार्तिक हॉस्पिटलमध्ये!
2 या पाच अभिनेत्रींनी धुडकावली होती ‘कुछ कुछ होता है’ची ऑफर
3 अनुष्काच्या घरी आली छोटी पाहुणी
Just Now!
X