News Flash

म्हणून पुन्हा एकदा ट्विटरच्या कारभारावर भडकले अमिताभ बच्चन

काही दिवसांपूर्वी फॉलोअर्सची संख्या घटल्यानं अमिताभ बच्चन यांनी ट्विटर अकाऊंट बंद करण्याची धमकी दिली होती. ट्विटर जाणीवपूर्वक आपल्या फॉलोअर्सची संख्या घटवत असल्याचा आरोप त्यांनी केला

अभिताभ बच्चन

भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अमिताभ बच्चन हे एकेकाळी अग्रस्थानी होते. अर्थात आजही मोदी, शाहारूखनंतर बिग बींच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ट्विटर कंपनी जाणीवपूर्वक आपल्या फॉलोअर्सची संख्या कमी दाखवत असल्याचा आरोप त्यांनी या मायक्रोब्लॉगिंग साईटवर केला होता. जर फॉलोअर्सची संख्या अशीच घटत राहिली तर मी ट्विटर अकाऊंट बंद करेन असा धमकीवजा इशाराही त्यांनी कंपनीला दिला होता. आता पुन्हा एकदा कंपनीवर अमिताभ बच्चन यांनी नाराजी दर्शवली आहे.

‘माझ्या फॉलोअर्सचा आकडा गेल्याकाही दिवसांपासून आहे तेवढाच आहे. त्यात जराही वाढ दिसली नाही. मला आश्चर्य वाटतं की ट्विटरची टीम हे सगळं कसं काय जुळवून आणते. मी ट्विटरवर सर्वाधिक अॅक्टीव्ह असतो पण तरीही षट्कार लागावूनही धावफलकांवरचा आकडा काही बदलत नाही. हे बाकी चांगलं सुरुय’ अशी उपरोधिक टीका त्यांनी कंपनीवर केली आहे. अमिताभ बच्चन यांचे ट्विटवर ३ कोटी ४३ लाख फॉलोअर्स आहेत फक्त भारतातच नाही तर जगभरात सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत बिग बींचाही समावेश आहे.

पण काही दिवसांपूर्वी ट्विटर त्यांनी टीका करत फॉलोअर्सच्या घटत्या संख्येवर नाराजी दर्शवली होती. हा अन्याय आहे अशा शब्दात ट्विट करत त्यांनी नाराजी दर्शवली होती. आता यावर ट्विटर कंपनी काय स्पष्टीकरण देते हे पाहण्यासारखं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 10:07 am

Web Title: amitabh bachchan questions twitter management team about his constant followers number
Next Stories
1 कॉमेडियन कपिल शर्माची पत्रकाराला नोटीस, मागितली १०० कोटींची नुकसान भरपाई
2 ‘कलंक’साठी माधुरी झाली आलिया भट्टची ‘डान्स गुरू’
3 नाटकाचा शस्त्र म्हणून वापर करा – नाना पाटेकर
Just Now!
X