चीनमधील वुहान या करोना विषाणूच्या केंद्रस्थान असेल्या शहरातून पसरलेल्या रोगामुळे जगभरामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या साडेचार हजारहून अधिक झाली आहे. चीनबरोबरच इतर ९० हून अधिक देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे. या व्हायरसचा भारतातही शिरकाव झाला आहे. पुण्यात करोनाचे आठ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात आता एकूण १२ करोनाग्रस्त रुग्ण सापडल्याचे समजते आहे. अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी करोनावर एक कविता केली आहे.

बिग बींनी नुकताच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी करोना व्हायरसवर मेसेज फॉर्वड करणाऱ्यांची काव्यात्मक फिरकी घेतली आहे. त्यांची ही कविता चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : “बाहेरुन आला अन् धिंगाणा केला…” करोना व्हायरसवर आले मराठी गाणे

 

View this post on Instagram

 

“बहुतेरे इलाज बतावें ,जन जनमानस सब , केकर सुनैं, केकर नाहीं, कौन बताए इ सब ; केयु कहिस कलौंजी पीसौ, केयु आँवला रस केयु कहस घर म बैठो, हिलो न ठस से मस ईर कहेन औ बीर कहेन, की ऐसा कुछ भी Carona , बिन साबुन से हाथ धोई के ,केहू के भैया छुओ न ; हम कहा चलो हमौ कर देत हैं , जैसन बोलैं सब आवय देयो , Carona-फिरोना , ठेंगुआ दिखाऊब तब !” ~ अब

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

आणखी वाचा : सुबोध भावेलाही करोनाचा फटका, घेतला मोठा निर्णय

सध्या संपूर्ण देशात करोनाची दहशत पाहायला मिळते. संपर्कातून करोनाची लागण होण्याचा धोका वाढत असल्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. यामध्ये रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. तर परदेशात होणाऱ्या काही चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे.