सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारे बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी विविध पोस्ट लिहित असतात. कधी सुविचार, कधी कविता ते ट्विटर, इन्स्टाग्राम व फेसबुकवर लिहितात. त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टमधून चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. आयुष्यात या सहा प्रकारच्या लोकांपासून कायम दूर राहा असं म्हणत त्यांना एक संस्कृत श्लोक लिहिला आहे.

संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगत त्यांनी पुढे लिहिलं, ‘सर्वांची ईर्ष्या करणारे, घृणा करणारे, सतत नाखूश राहणारे, रागीट, सतत शंका घेणारे आणि इतरांवर अवलंबून असणारे… हे सहा प्रकारचे लोक नेहमी दु:खी असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूरच राहिलं पाहिजे.’

 

View this post on Instagram

 

*ईर्ष्यी घृणी त्वसंतुष्ट: क्रोधनो नित्यशड्कितः।* *परभाग्योपजीवी च षडेते दुखभागिनः।।* *अर्थात-* सभी से ईर्ष्या करने वाले, घृणा करने वाले, असंतोषी, क्रोधी, सदा संदेह करने वाले और पराये आसरे जीने वाले ये छः प्रकार के मनुष्य हमेशा दुखी रहते हैं। अतः यथा संभव इन प्रवृत्तियों से बचना चाहिए। They that express jealousy always towards others, they who ever dislike all others, they that remain dissatisfied, angered , they that are always and ever doubting .. and those who live off others .. these 6 kinds of individuals shall remain ever filled with sadness .. whenever possible we need to save ourselves from such trend setters ..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

बिग बींना करोनाची लागण झाली असून मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली होती. बिग बींसोबतच अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण झाली आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्यामुळे मुंबई महापालिकेने रविवारी ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे त्यांचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून टाळेबंद केले. चारही बंगले र्निजतुक करण्यात आले असून पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांतील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गेल्या १४ दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध पालिकेने सुरू केला आहे. दरम्यान, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नवेली, अगस्त नंदा यांची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्याचे समजते.