22 October 2020

News Flash

बिग बींनी चिमुकल्यासोबतचा शेअर केला फोटो; त्यांच्यात आहे ‘हे’ खास नातं!

जाणून घ्या, या बॉलिवूड स्टारविषयी

बदलत्या काळानुसार कलाविश्वातही अनेक बदल झाले. सिनेस्टार्सनंतर आता त्यांच्या मुलांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये अशी अनेक घराणी आहेत ज्यांच्या पिढ्यानपिढ्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आज बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड आहेत ज्यांची अफाट लोकप्रियता आहे. त्यामुळे या स्टारकिडविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहत्यांचा प्रयत्न असतो. यातच कलाकारही त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटवर एका बॉलिवूड स्टारच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

आतापर्यत अनेक कलाकारांनी त्यांच्या लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये बिग बींनीदेखील एका चिमुकल्याचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा चिमुकला दुसरा-तिसरा कोणी नसून अभिषेक बच्चन आहे. अभिषेकच्या जन्माच्यावेळी हा फोटो काढण्यात आला आहे.


अभिषेक येत्या ५ फेब्रुवारी रोजी त्याचा ४४ वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. त्यामुळे बिग बींनी वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वीच अभिषेकला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. शेअर केलेला फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट असून या फोटोमध्ये अभिषेक अत्यंत लहान असल्याचं दिसून येत आहे. त्याच्या बाजूला अमिताभ बच्चन उभे आहेत.

वाचा : अनिल कपूर म्हणतात, ‘बदल घडवण्यासाठी एक माणूस पुरेसा आहे’!

अमिताभ बच्चन अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. अनेक वेळा ट्विटरवर ते त्यांचं मत मांडत असतात. सध्या ते त्यांच्या आगामी ‘चेहरे’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त ते ‘द बिग बुल’ आणि ‘ब्रीथ’ या सीरिजमध्येही झळकणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 1:09 pm

Web Title: amitabh bachchan shares picture of newborn abhishek bachchan in hospital minutes after birth see here ssj 93
Next Stories
1 “तुम्ही माझं रेटिंग बदललं, मन नाही”, छपाक चित्रपटाला डाऊनवोट करणाऱ्यांना दीपिकाचं उत्तर
2 गांधीजींचे मारेकरी आजही जिवंत – स्वरा भास्कर
3 …अन् शशांक केतकरला लागली लॉटरी
Just Now!
X