24 October 2020

News Flash

Video : बिग बींना वाढदिवसाची खास भेट, ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

त्यांची दाढी वाढलेली असून कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यात आला आहे.

स्येरा नरसिंहा रेड्डी

बॉलिवूडचा महानायक अर्थात बिग बी यांचा आज ७६ वा वाढदिवस. त्यामुळे सध्या सर्व स्तरांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक खास भेट देण्यात आली आहे. त्यांच्या आगामी ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

अमिताभ बच्चन लवकरच तेलुगु चित्रपट ‘स्येरा नरसिंहा रेड्डी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये बिग बी कॅमियो रोलमध्ये दिसून येणार आहेत. आज बिग बींचा वाढदिवस असल्यामुळे या चित्रपटाचा फर्स्ट लूक युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला.
प्रदर्शित झालेल्या लूकमध्ये अमिताभ एका नव्या अंदाजात दिसत आहेत. यात त्यांची दाढी वाढलेली असून कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यात आला आहे.

दरम्यान, मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये नयनतारा, विजय सेतुपती, तमन्ना आणि सुदीप यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 11:18 am

Web Title: amitabh bachchan sye raa narasimha reddy film look motion teaser on big b birthday
Next Stories
1 ‘लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केवळ प्रसिद्धीसाठी’
2 राजपाल यादवच्या घरी चिमुकलीचं आगमन
3 #Happy Birthday Amitabh Bachchan : कलाविश्वातून बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव
Just Now!
X