हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या सुखासाठी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा’ पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला आहे. अशा शिवाजी महाराजांना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी जयंतीनिमित्त मानाचा मुजरा केला आहे.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर कसं होत? पाहा त्यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलेलं पत्र

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर हा एक मंत्र आहे. आजही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. ते जगातील सर्वोत्कृष्ट योद्धा आणि आदर्श राजा होते. त्यांची आठवण कायम प्रेरणादायक राहिल. छत्रपती शिवाजी महाराज यांना शत् शत् नमन। अशा आशयाचं ट्विट करुन अमिताभ बच्चन यांनी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभाव मानणारे होते. धर्मवेडाने राज्य मोठे होत नाही. सर्व धर्मासंबंधी सहिष्णू भाव असल्याने राज्य मोठे होते अशी ही राजांची ठाम धारणा होती. अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध महाराज लढले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्या हिंदू धर्माचे महाराजांनी रक्षण तर केलेच. पण त्या बरोबरच इतर धर्मांचाही आदर केला. मशिदी, कुराण या मुसलमानांच्या श्रद्धास्थानांना आपल्या सैनिकांनी कोणताही उपद्रव देऊ नये अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी दिली होती. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व स्तरातून त्यांना मानाचा मुजरा करण्यात येत आहे.