“मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही”, असा अमिताभ बच्चन यांनी लिहलेला ब्लॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत त्यांचे विचार व्यक्त करत असतात. नुकताच त्यांनी एक ब्लॉग लिहलेला असून, तो चर्चेत आहे. बच्चन यांची प्रकृती खालावल्याचे व त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आल्याचे या ब्लॉगच्या माध्यमातून समोर आले आहे…
अमिताभ यांनी हा ब्लॉग शनिवारी रात्री लिहिला होता. ‘मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही, असे अमिताभ यांनी त्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्यांच्या हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. बिग बींच्या ब्लॉगवरुन त्यांना नेमकं काय झालं आहे ? त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे? याचा अंदाज लावता येत नसल्यानं चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.
दरम्यान, अमिताभ यांनी केलेल्या ट्विटने देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ते ट्विट पाहिल्यानंतर चाहत्यांनी बिग बींच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
T 3826 –
कुछ ज़रूरत से ज़्यादा बढ़ गया है ; कुछ काटने पर सुधरने वाला है ;
जीवन काल का कल है ये , कल ही पता चलेगा कैसे रहे वे— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 26, 2021
अमिताभ अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात लवकरच दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ यांच्या सोबत अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार आहेत. सोबतच अभिनेता इम्रान हाश्मी सोबत ते ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर ‘सैराट’ दिग्दर्शक नागारज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत अमिताभ दिसणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2021 12:09 pm