महानायक अमिताभ बच्चन हे सध्या आगामी सिनेमा ‘102 नॉट आउट’ च्या तयारीत आहेत. नुकतंच त्यांनी सिनेमासाठी एका गाण्याचं चित्रिकरण केलं. पण चित्रिकरणादरम्यान मध्यरात्री अचानक अमिताभ बच्चन यांच्या फोनचं नेटवर्क गायब झालं. स्वतः बिग बींनी याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली.
बच्चन यांनी एकापाठोपाठ दोन ट्विट करून ‘ मोबाइल नेटवर्क कंपनीवाल्यांनो कृपया जागे व्हा…काहीच सुरू नाहीये…..व्होडाफोन…सगळे मेसेज फेल होत आहेत, तुम्ही 4G दाखवतात पण काहीच काम होत नाहीये’ असं म्हटलं.
T 2763 – Mobile carriers please WAKE UP .. nothing going through !! pic.twitter.com/6GYZejuO89
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 3, 2018
बच्चन यांच्या ट्विटनंतर 15 मिनिटांतच व्होडाफोनचं नेटवर्क पुन्हा कार्यरत झालं, त्यावर बिग बींनी पुन्हा ‘ चला..व्होडाफोनने आमचं ऐकलं…मेसेज जायला लागलेत’ असं ट्विट केलं.
T 2763 – Oye ..!! VODAFONE .. nothing going through .. all messages failing .. you show 4G .. but nothing is going ji ..
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 3, 2018
T 2763 – Chalo .. !! sun li sun li VODAFONE ne hamari baat sun li .. messages going now ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 3, 2018
‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट सौम्या जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकावर आधारित आहे. चित्रपटाची कथाही सौम्या जोशी यांनीच लिहिलेली आहे. या चित्रपटात शंभरी पार केलेल्या वडिलांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन आणि वय वर्ष सत्तर असलेल्या तरुणाच्या म्हणजेच त्यांच्या भूमिकेत ऋषी कपूर दिसणार आहेत. ‘अमर अकबर अॅँथनी’, ‘अजूबा’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमधून कधी मित्र, तर कधी भाऊ अशा नात्यांतून लोकांसमोर आलेली ही जोडगोळी कित्येक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे.