बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा विनोदी व्हिडीओ असून हे एक मीम आहे. हे मीम अमिताभ यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातल्या डायलॉग्सवर आहे. लक्षवेधी गोष्ट अशी आहे की, या व्हिडीओमध्ये WWE चा सुपरस्टार रेसलर अंडरटेकर आणि गोल्डबर्ग यांच्यातील लढाई दिसत आहे. अंडरटेकर आणि गोल्डबर्ग WWE च्या रिंगमध्ये आहेत. आणि जेव्हा गोल्डबर्ग अंडरटेकरला त्याचे नाव विचारतो. तेव्हा अंडरटेकर ‘अग्निपथ’चे डायलॉग बोलतो. हे मीम प्रचंड व्हायरल झालं आहे. हे मीम शेअर करत “विजय दिनानाथ चौहान…पुरा नाम” अशा आशयाचं कॅप्शन अमिताभ यांनी दिलं आहे.
T 3780 – VIJAY DINANATH CHAUHAAN .. poora naam !!! pic.twitter.com/MI0cfRcTEP
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 11, 2021
अमिताभ बच्चन हे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या सोबत ब्रम्हास्त्र या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यानंतर ‘शहर’ आणि ‘झुंड’ या चित्रपटात बिग बी भूमिका साकारणार आहेत.