नवनवीन मालिका आणि त्यांचे दर्जेदार सादरीकरण याच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. असाच एक वेगळा विषय असलेली स्टार प्रवाहवरील मालिका म्हणजे ‘जिवलगा.’ या मालिकेमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट पाहाला मिळाली आहे. आता या मालिकेतील काव्या उर्फ अमृताचा मालिकेतील प्रवास संपणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या सर्व चर्चा अमृताने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे सुरू झाल्या आहेत.

नुकताच अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृताने जिवलगा मालिकेतील सर्व कलाकरांचे फोटो शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अमृताने सर्वांचे आभार मानले असून आता मी माझ्या पुढच्या प्रवासाठी मोकळी असे देखील कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अमृताचा हा व्हिडीओ आणि कॅप्शन पाहता मालिकेतील अमृताच्या भूमिकेत आता दुसरी कोणती अभिनेत्री दिसणार? मालिकेतील काव्या या पात्राचा मालिकेतील प्रवास इथेच संपतो का? किंवा मालिका कोणते नवे वळ घेणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जिवलगा’ या मालिकेमध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते आहे. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित केले आहे.