07 March 2021

News Flash

तुम्हीही घेऊ शकता अनन्यासारखा ड्रेस; किंमत आहे कमी

जाणून घ्या, अनन्याच्या ड्रेसची किंमत

बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या अभिनयासोबत लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात. यात दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर यासारख्या अभिनेत्रींच्या महागड्या बॅग्स आणि कपड्यांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. यामध्येच आता सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडेची. अलिकडेच अनन्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालदीवला गेली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनन्या अभिनेता इशान खट्टरसोबत मालदीवला गेली होती. या ट्रीपमधील अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील तिच्या एका ड्रेसच्या किंमतीची चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya (@ananyapanday)


अनन्याने या ट्रीपमध्ये यल्लो आणि रेड रंगाचा एक वनपीस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती अत्यंत कूल लूकमध्ये दिसत होती. विशेष म्हणजे हा ड्रेस महागडा वाटत असला तरीदेखील त्याची किंमत अत्यंत कमी आहे. या ड्रेसची किंमत जवळपास ८ हजार ७७३ रुपये असल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, ‘स्टुटंड ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्याचसोबत तिने इशान खट्टरसोबत ‘खाली पीली’ या चित्रपटातही काम केलं आहे. अनन्या अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 10:51 am

Web Title: ananya panday in rs 8k mini dress is simply breathtaking in pic from maldives ssj 93
Next Stories
1 “..म्हणून मी बोल्ड सीन करणार नाही”; गौहर खानने केलं स्पष्ट
2 दोनाचे चार हात! अभिज्ञा भावेने बांधली मेहुलसोबत साताजन्माची गाठ
3 “मी इन्स्टा’ग्रामीण’ माणूस”; निलेश साबळेचं सोशल मीडियावर पदार्पण
Just Now!
X