News Flash

घराणेशाहीवर बोलण्यापेक्षा कामातून व्यक्त व्हा – अनन्या पांडे

फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर सगळीकडेच घराणेशाही आहे. पण आपण आपल्या कामातून व्यक्त झालं पाहिजे.

अनन्या पांडे

अभिनेत्री अनन्या पांडेने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर सिनेसृष्टीत तिच्या नावाची खूप चर्चा आहे. ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटातील तिच्या कामाचे चित्रपट समीक्षकांकडून व प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले होते.

‘आय.बी टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने घराणेशाही, आगामी चित्रपट, तिच्या इच्छा अशा विविध विषयांवर तिची मतं व्यक्त केली. बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर नेहमीच घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित होतो. अनन्या पांडे ही सुप्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. तिला घराणेशाहीबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली की, “या गोष्टीचा ताण नक्कीच होता. मला मिळालेल्या संधींबाबत मी सजग होते. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर सगळीकडेच घराणेशाही आहे. पण आपण आपल्या कामातून व्यक्त झालं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की, आपण मनापासून मेहनत केली पाहिजे. या मेहनतीमुळे आपण नक्कीच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू शकतो.”

याच मुलाखतीत तिने तिच्या आगामी ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाबद्दल सांगितले. “या चित्रपटातीळ माझी भूमिका ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’पेक्षा खूप वेगळी आहे.” असं ती म्हणाली. तिच्या मनातील आदर्श व्यक्तींबाबत तिला विचारलं असता तिने आलिया भट्टचे नाव घेतले. “झोया अख्तर, संजय लीला भन्साळी, डेविड धवन यांच्यासोबत काम करायला मला खूप आवडेल.” असंही ती म्हणाली. दिग्दर्शकांसोबतच रणवीर सिंग व वरुण धवनसोबत तिला काम करायला आवडेल असंही ती म्हणाली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 6:15 pm

Web Title: ananya pande nepotism hardwork
Next Stories
1 तुमच्या आवडत्या मालिकांसोबत रंगणार मनोरंजनचा रविवार
2 सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी सोडली बँकेची नोकरी
3 कतरिनाने मारले सुनील ग्रोव्हरच्या थोबाडीत, सलमान झाला खूश
Just Now!
X