30 May 2020

News Flash

अनिल कपूर यांनी नकार देणाऱ्या दिग्दर्शकाकडेच मागितला ऑटोग्राफ; कारण…

अनिल कपूर यांनी सांगितला अविस्मरणीय किस्सा

ख्रिस्तोफर नोलन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरनेते वाट पाहात असतात. या तरबेज दिग्दर्शकासोबत काम करणं हे अनिल कपूर यांचं स्वप्न आहे. परंतु त्यांच्या या स्वप्नावर स्वत: नोलनेच पाणी फिरवलं होतं. अनिल कपूर यांनी नोलनने दिलेल्या त्या नकाराचा किस्सा सांगितला.

हे फोटो पाहाच – काय म्हणावं हिला चिकन तंदुरी की वडापाव?; रिहानाची तुलना खाद्य पदार्थांशी

अवश्य वाचा – पाकिस्तानातील विमान अपघातावर बॉलिवूड निर्मात्याची प्रतिक्रिया; म्हणाला…

अनिल कपूर यांनी ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’ या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला आहे. या ट्रेलरसोबतच त्यांनी तो अविस्मरणीय किस्सा सांगितला आहे. “आठवतयं का मी ‘इनसेप्शन’च्या ऑडिशनसाठी तुमच्याकडे आलो होतो. पण रिजेक्ट झालो. परंतु मी हार मानली नाही ‘बॅटमॅन’च्या डीव्हीडीवर तुमचा ऑटोग्राफ घेऊनच घरी परतलो. ‘टेनेट’ चित्रपटाला माझ्या शुभेच्छा. हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरकडे घेऊन येईल अशी मला खात्री आहे.” अशा आशयाचे ट्विट अनिल कपूर यांनी केलं आहे.

‘इनसेप्शन’ हा एक सुपरहिट चित्रपट होता. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल चार ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरले होते. अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ याने चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाची पटकथा माणसाची स्वप्न आणि त्यामधील विचार यांच्यावर आधारित होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 11:37 am

Web Title: anil kapoor christopher nolan inception tenet mppg 94
Next Stories
1 या विनायक चतुर्थीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दु:खहर्ता ‘श्री गणेश’
2 एकेकाळी जेवायलाही पैसे नव्हते; तेजस्विनी पंडितची संघर्षकथा
3 शहनाज गिलच्या वडिलांनी बलात्काराचा आरोप फेटाळला
Just Now!
X