खान युगातल्या प्रत्येक नटाला टक्कर देऊन ८० ते ९० च्या दशकात सक्षमपणे आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. भूमिका जगणं काय असतं हे श्रीदेवी यांचे चित्रपट पाहून आपल्याला कळतं. ‘चालबाज’ हा चित्रपट हेमा मालिनी यांच्या सीता और गीता चित्रपटाचा रिमेक होता. मात्र तो रिमेक आहे हे विसरायला लावले ते श्रीदेवी यांनी. या चित्रपटातील भूमिकेची ऑफर अभिनेते अनिल कपूर यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. हा किस्सा स्वत: अनिल कपूर यांनी एका रिअॅलिटी शोच्या मंचावर सांगितला.

श्रीदेवी यांची कलाविश्वातील कारकीर्द साजरी करण्यासाठी अनिल कपूर आणि जितेंद्र यांनी ‘डान्स प्लस ४’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. अनिल कपूर यांनी श्रीदेवींसोबत बरेच सुपरहिट चित्रपट केले. त्यांच्याबदल अनिल कपूर म्हणाले, ‘अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन कसं करायचं हे श्रीदेवी यांना ठाऊक होतं. जबरदस्त व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयाच्या जोरावर त्या जेव्हा स्क्रीनवर झळकत, तेव्हा इतर कोणाकडेच लक्ष जात नाही. त्यांच्यासोबत चालबाज या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली होती. या चित्रपटात त्या दुहेरी भूमिका साकारत होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर मला काय मिळणार असा मी विचार आणि तो चित्रपट नाकारला. चालबाजमधील त्यांनी साकारलेल्या भूमिकांची तुलनाच होऊ शकत नाही.’

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Randeep Hooda says he sold his fathers properties for Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी वडिलांची मालमत्ता विकली, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “मी खूप…”

वाचा : ‘कॉफी विथ करण ६’मध्ये लवकरच ‘बाहुबली’ आणि ‘भल्लाल देव’

‘चालबाज’मध्ये श्रीदेवी यांच्यासोबत सनी देओल आणि रजनीकांत यांनी भूमिका साकारली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात एकत्र काम केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला.