News Flash

अनिल कपूर यांनी अनोख्या अंदाजात केले सोनमचे कौतुक

स्टारडस्ट पुरस्कार सोहळ्यात अनिल कपूर यांनी सोनमला सर्वांसमोर चांगलेच सुनावले होते.

अभिनेता अनिल कपूर आणि सोनम कपूर (संग्रहित छायाचित्र)

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सोनम कपूरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळविल्यामुळे तिचे पिता अनिल कपूर फारच आनंदीत झाले आहेत. अनिल कपूर यांनी आपला आनंद अनोख्या पद्धतीने व्यक्त करत सोनमचे कौतुक केले आहे. नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित बनलेल्या ‘नीरजा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सोनम कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ताज मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सोनमचे एव्हरग्रीन पिता अनिल कपूर यांनी सोनम कपूरचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनम कपूर पांढऱ्या शुभ्र फ्रॉकमध्ये दिसते. अनिल यांनी इनस्टाग्रामवरुन शेअर केलेल्या फोटोला ‘ मला तुझा खूप गर्व आहे’ अशा आशयाचे कॅप्शनही दिले आहे.

सोनम कपूर आपले वडील अनिल कपूर यांची प्रशंसा तर नेहमीच करत असते. वडिलांच्या कौतुकाचे पूल बांधताना ती कधीच थकतही नाही. काही दिवसांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात सोनमे असे काही केले की अनिल यांना सगळ्यांसमोर तिला सुनवावे लागले होते. स्टारडस्ट या पुरस्कार सोहळ्यात ‘पिंक’ आणि ‘नीरजा’ या दोन चित्रपटांच्या फिल्ममेकर ऑफ दि इयर हा पुरस्कार मिळाला होता. हे दोन्ही पुरस्कार अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्या हस्ते देण्यात येत होते. दोन्ही चित्रपटाच्या टीमला स्टेजवर बोलवण्यात आले होते. दोन्ही चित्रपटाची संपूर्ण टीम स्टेजवर हजर होती फक्त सोनम मात्र कोणाशी तरी गप्पा मारण्यात व्यग्र होती. तेव्हा अनिलने स्टेजवर माईक घेऊन सोनमला बोलावले आणि म्हणाला की, तिने आपल्या बाबांकडून काही तरी शिकले पाहिजे आणि आपल्या टीमला येऊन सहभागी झाले पाहिजे. सोनम तेव्हा स्टेजवर आली. यावेळी सोनमला आपल्या बाबांचे बोल फारच कडवे वाटले होते.

गेले काही दिवस अभिनेत्री सोनम कपूर बरीच चर्चेत होती. गेल्या वर्षी तिने ‘नीरजा’ या चित्रपटातून केलेल्या अभिनयामुळे सोनमने अनेकांची प्रशंसा मिळवली होती. चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांनीही या चित्रपटातील सोनमने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला दाद दिली होती. याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर नीरजा भानोतच्या कुटुंबायांसाठीही सोनम एका सदस्याप्रमाणेच वाटू लागली. त्यामुळेच सामाजिक न्याय या प्रवर्गातील ‘द मदर तेरेसा मेमोरियल इंटरनॅशनल अॅवॉर्ड २०१६’ या पुरस्कार सोहळ्यासाठी सोनम कपूर प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहिली होती. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सोनमने भनोत कुटुंबियांच्या वतीने एक पुरस्कार स्वीकारल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 11:24 pm

Web Title: anil kapoor share daughter sonam childhood photo after filmfare award
Next Stories
1 बॉलिवूडचा खिलाडी या चित्रपटासाठी घेणार आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन
2 VIDEO: शाहिदने केली मीराची नक्कल
3 …म्हणून यामीला ह्रतिक ‘काबिल’ वाटतो
Just Now!
X