14 August 2020

News Flash

सुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी अंकिताने केली ‘पवित्र रिश्ता’च्या सीक्वलची मागणी

एकता कपूरची सुशांतला मालिकेद्वारे श्रद्धांजली

अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने गळफास लावून आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतला एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला होता. त्यामुळे सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या मालिकेचा सिक्वल तयार करावा, अशी विनंती अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने एकता कपूरला केली आहे. अंकिताच्या या विनंतीवर एकताने देखील हिरवा झेंडा दाखवला आहे.

अवश्य पाहा – ‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

अंकिता लोखंडे सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेदरम्यान दोघं एकमेंकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास सहा वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. परंतु काही अंतर्गत मतभेदांमुळे दोघांच ब्रेकअप झालं. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचा सिक्वल तयार करण्याची विनंती एकता कपूरला केली आहे. सर्वप्रथम एकतामुळेच सुशांतला टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर सुशांतचा जबरदस्त अभिनय पाहून त्याला चित्रपटांच्या देखील ऑफर मिळू लागल्या. एकता कपूर देखील सुशांतच्या आत्महत्येमुळे दु:खी आहे. त्याच्या कामाला सलाम करण्यासाठी ती मालिकेचा सिक्वल तयार करणार आहे. सध्या या सिक्वलच्या पटकथेवर काम सुरु आहे.

अवश्य पाहा – “हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान चाहत्यांनी CBI चौकशीची मागणी केली आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 2:56 pm

Web Title: ankita lokhande approaches ekta kapoor for pavitra rishta sequel as a tribute to sushant mppg 94
Next Stories
1 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : आदित्य चोप्रांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला
2 “पद्मश्री पुरस्कार परत करेन, जर सुशांत…” कंगना रणौतचे खळबळजनक विधान
3 नेपाळच्या पंतप्रधानांच्या प्रभू रामचंद्रांवरच्या दाव्याने टीव्हीवरची ‘सीता’ही चकित, पोस्ट केला फोटो
Just Now!
X