News Flash

‘मणिकर्णिका’नंतर अंकिताला मिळाला एक मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट

टायगर श्रॉफ व रितेश देशमुखसोबत करणार स्क्रीन शेअर

अंकिता लोखंडे

छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने या वर्षाच्या सुरुवातीला ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात तिने झलकारी बाईची भूमिका साकारली होती आणि तिच्या अभिनयाचं कौतुकसुद्धा झालं होतं. त्यानंतर आता आणखी एका मोठ्या बॉलिवूड चित्रपटाची ऑफर अंकिताला मिळाली आहे. साजिद नाडियादवाला निर्मित ‘बागी ३’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

‘बागी’ फ्रँचाइजीमधला हा तिसरा चित्रपट असून अहमद खान याचे दिग्दर्शन करणार आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, रितेश देशमुख व श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अंकिता ही श्रद्धाच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. तर या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात रितेश टायगरच्या भावाच्या भूमिकेत आहे.

पाहा फोटो: आजच्या तरुण अभिनेत्रींनाही लाजवेल असे अश्विनी भावेंचे सौंदर्य

याविषयी ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, ”मणिकर्णिकानंतर मला व्यावसायिक चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. ‘बागी ३’च्या निमित्ताने ती पूर्ण होत आहे. टायगर, रितेश आणि श्रद्धासोबत काम करणं आव्हानात्मक आहे. पण माझी भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहावी यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. पहिल्या दोन भागांपेक्षा या तिसऱ्या भागाची कथा पूर्णपणे वेगळी आहे.”

अंकिताला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची चर्चा होती. मात्र इतक्यात तरी लग्नबंधनात अडकणार नसल्याचं अंकिताने स्पष्ट केलं. विकी जैन या व्यावसायिकाला ती डेट करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 12:06 pm

Web Title: ankita lokhande roped in the third instalment of baaghi ssv 92
Next Stories
1 ‘एकदा नाही तर, पाच वेळा झाले कास्टिंग काऊचची शिकार’
2 VIDEO: ‘..म्हणून मी मनोज यांची चप्पल ठेऊन घेतली’; आठवण सांगताना पंकज यांना अश्रू अनावर
3 Photo : अशा पद्धतीने अ‍ॅमीने केलं बाळाचं स्वागत
Just Now!
X