प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनू कपूर यांनी धर्म, संस्कृती आणि इतिहासाचे विदृपीकरण करण्यावर भाष्य करत म्हटले की, मी एका चुकीच्या क्षेत्रात आलो आहे. एका खासगी कार्यक्रमात अनू कपूर यांनी सिनेसृष्टीतील मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आमिर खाननेही हिंदू धर्माची मस्करी केली होती, ज्यानंतर हिंदू कट्टरवादीयांनी त्याचा विरोध केला होता. ते आपली संस्कृती वाचवण्यासाठी पुढे आले होते. मला वाटतं की प्रत्येकानेच आपला धर्म- संस्कृतीला वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे.

नुकेतच राजस्थानमध्ये जयगढ किल्यात संजय लीला भन्साळी यांना पद्मावती सिनेमाच्या सेटवर मारहाण करण्यात आली होती. यावर आपले मत देताना अनू कपूर म्हणाले की, इतिहासाच्या नावाखाली प्रणयदृश्य दाखवणे कितपत योग्य आहे? सिनेमा निर्मात्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर सिनेमा बनवून दाखवावा. ते पुढे म्हणाले की, त्यांना आयएएस व्हायचे होते, पण कौटुंबिक समस्यांमुळे मी थिएटर आणि अभिनयाकडे वळलो. खरे सागायचे तर मला जबरदस्ती अभिनय करावा लागायचा. पैशांच्या कमतरतेमुळे तर मला काही अॅडल्ट सिनेमेही करावे लागले होते. विकी डोनरनंतर काही चांगली कामे येऊ लागली.

१० डिसेंबरला प्रदर्शित होणारा अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी २ या सिनेमात अनू कपूर एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित सिनेमाच्या सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत आहे. याआधीच्या सिनेमात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. मात्र सिक्वलमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली आहे.