‘जग्गा जासूस’ हा बॉलिवूडमधील एक प्रयोगशिल चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तिकिटबारीवर फारसं यश मिळालं नाही. परंतु समिक्षकांनी मात्र या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. अभिनेता गोविंदामुळे हा चित्रपट तिकिटबारीवर आपटला असं म्हटलं जातं. या चर्चेवर अखेर दिग्दर्शक अनुराग बासू याने मौन सोडलं आहे. “होय, आम्ही गोविंदाला चित्रपटाला बाहेर केलं. याला त्याचा आळशीपणा जबाबदार होता असा चकित करणारा अनुभव अनुरागने सांगितला.
अवश्य पाहा – मिथून चक्रवर्ती यांची ग्लॅमरस सून; फोटो पाहून व्हाल अवाक्
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने जग्गा जासूस या चित्रपटाला मिळालेल्या अपयशावर भाष्य केलं. त्यावेळी त्याने गोविंदासोबत झालेले मतभेदही सांगितले. तो म्हणाला, “गोविंदा हा बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता आहे. पण मला मात्र त्याच्यासोबत फारच वाईट अनुभव मिळाला आहे. चित्रपटाचं शूटिंग आफ्रिकेतील जंगलात सुरु होतं. तिथे शूट करण्यासाठी आम्हाला प्रती दिवस लाखभर रुपये खर्च करावे लागत होते. पण गोविंदा मात्र दररोज सेटवर उशीरा पोहोचायचा. शिवाय सेटवर येऊन तो डायलॉग्सचं पाठांतर करायचा. त्यामुळे शूटिंगला खूप उशीर होत असे. जो सीन काही तासांचा होता त्याला शूट करायला काही दिवस लागत होते. अखेर त्याचे सुपरस्टार नखरे आणि आळशीपणाला वैतागून आम्ही त्याला चित्रपटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.”
अवश्य पाहा – अरबाजसोबत लग्न करणार का? जॉर्जिया म्हणाली, “लग्नाचा विचार…”
चित्रपटातून बाहेर काढल्यानंतर गोविंदाने अनुराग बासूवर प्रचंड टीका केली होती. “मला कुठलीही स्क्रिप्ट न देता केवळ रणवीरच्या वडिलांसाठी मी होकार दिला होता. माझ्यासोबत कुठलाही करार त्यांनी केला नव्हता. मला साईनिंग अमाउंट देखील मिळाली नव्हती. तरी देखील मी शांतपणे काम करत होतो. परंतु अपमानाची देखील एक मर्यादा असते. अखेर मीच चित्रपटातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.” असं तीन वर्षांपूर्वी गोविंदा म्हणाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 27, 2020 4:37 pm