पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावरुन दिग्दर्शक अनुराग कश्यप याने मोदींवर टीका केली आहे. “देशवासीयांसाठी जमा केलेले ते १५ लाख रुपये जोडून या पॅकेजची घोषणा केली.” असा टोला अनुरागने लगावला आहे.

अवश्य पाहा – करोनामुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; कमबॅक करण्याआधीच मालिका बंद

नेमकं काय म्हणाला अनुराग?

“मोदीजी जे १५ लाख रुपये देशवासीयांच्या खात्यात टाकणार होते त्या पैशांना जोडून हे पॅकेज तयार केलं आहे. खरं तर हे पैसे गेल्या सहा वर्षांपासून आजच्या दिवसासाठीच वाचवून ठेवले होते. आता हे पॅकेज आणखी वाढवले जाईल. पाहता पाहता आपण पाच अब्जांपर्यंत पोहोचू. याला म्हणतात दूरदर्शीपणा.” अशा आशयाचं ट्विट अनुरागने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य वाचा – “देवा आमच्यावर कृपा कर”; मोदींच्या भाषणाचा अभिनेत्याने घेतला धसका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.