बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. सोबतच तिने एफआयआरदेखील दाखल केला होता. परिणामी या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनुरागची तब्बल आठ तास चौकशी केली. मात्र या चौकशीवर पायल नाखुश आहे. अनुराग खोटं बोलतोय असं म्हणत तिने पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन

“अनुराग पोलिसांसमोर खोटं बोलतोय. त्याच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी त्याची नार्को अॅनालिसिस, लाइ डिटेक्टर आणि पॉलिग्राफ टेस्ट करावी. न्याय मिळवण्यासाठी आम्ही पोलिसांना एक विनंती अर्ज देखील करणार आहोत.” अशा आशयाचं ट्विट करुन पायलने अनुरागवर जोरदार टीका केली आहे. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील टॅग केलं आहे.

अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

अवश्य पाहा – भूमी पेडणेकर म्हणते, “…तर हा अभिनेता असता ‘सेक्स उपचार तज्ज्ञ’

गुरुवारी (१ ऑक्टोबर) सकाळी १०.०५ वाजता अनुराग चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर झाला होता. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता तो पोलीस स्थानकातून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे जवळपास ८ तास अनुरागची चौकशी करण्यात आल्याचं दिसून येत आहे. अनुरागला चौकशीसाठी बोलावल्यानंतर अभिनेत्री पायल घोषने मुंबई पोलिसांचे आभार मानले. मात्र, याच काळात अनुरागच्या वकिलांनी प्रियांका खिमानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागवरील आरोप फेटाळून लावले होते.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट काही दिवसांपूर्वी पायलने केलं होतं.