News Flash

“…तर मी अनुरागसोबतची मैत्री कायमची तोडेन”; तापसी पन्नूने केली घोषणा

अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर केला लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप

“…तर मी अनुरागसोबतची मैत्री कायमची तोडेन”; तापसी पन्नूने केली घोषणा

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. तिच्या या खळबळजनक आरोपांमुळे अनुरागवर सध्या जोरदार टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री तापसी पन्नू हिने प्रतिक्रिया दिली. जर या प्रकरणात अनुराग दोषी सिद्ध झाला तर मी त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकेन अशी घोषणा तिने केली आहे.

अवश्य पाहा – “इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी अनुरागने मला खोलीत बोलावलं”, अन्…; अभिनेत्रीचा खुलासा

तापसी अनुरागची खुप चांगली मैत्रीण आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत तिने अनुरागवर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “अनुराग स्त्रियांचा सन्मान करतो. आजवर कधीही त्याने महिलांसोबत गैरवर्तणुक केलेली नाही. समाजात वावरताना तो एखाद्या कठोर व्यक्तीसारखा भासतो, परंतु खरं तर तो खूप शांत आणि प्रेमळ स्वभावाचा आहे. त्याच्यावर केले जाणारे आरोप खोटे आहेत. आणि जर हे आरोप खरे सिद्ध झाले तर, मी अनुरागसोबतची मैत्री कायमची तोडून टाकेन.” अशी प्रतिक्रिया देत तापसीने अनुरागला पाठिंबा दिला आहे.

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 6:10 pm

Web Title: anurag kashyap payal ghosh taapsee pannu casting couch in bollywood mppg 94
Next Stories
1 कंगनाच्या आव्हानाला वासिम अक्रमच्या पत्नीनं दिलं प्रत्युत्तर; म्हणाली…
2 ‘मानसिक संतुलनाचे प्रदर्शन सध्या…’, करण पटेलने उडवली कंगनाची खिल्ली
3 हृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न