बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतच्या मैत्रीमुळे गेले काही दिवस जास्त चर्चेत आहे. पण, आता हे दोघे केवळ मित्रमैत्रीण आहेत असे म्हणणे योग्य राहणार नाही. कारण, खुद्द अनुष्कानेच या दोघांच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत हे दोघे ब-याच वेळा एकत्र दिसले होते. विराटने तर एका सामन्यात शतक झळकावल्यानंतर अनुष्काकडे पाहत फ्लाइंग किस दिली होती. पण या दोघांपैकी एकानेही आपल्यात प्रेमसंबंध असल्याच्या कोणत्याही बातमीला दुजोरा दिला नव्हता. अखेर, नुकतंच एका मुलाखतीत अनुष्काने तिच्या आणि विराटच्या प्रेमाची कबुली दिली. अनुष्का म्हणाली की, माझे आणि विराटचे प्रेमसंबंध असून मी आमच्या नात्याचा आदर करते. ही आमची वैयक्तिक बाब आहे आणि याचा योग्य तो आदर केला जावा म्हणून मी याविषयी बोलणे टाळते. मी काय करावे आणि काय करू नये हे मला कळते.
अनुष्काचे यावर्षी बॉम्बे वेल्वेट आणि दिल धडकने दो हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर दुसरीकडे, अनुष्काचा प्रियकर आणि भारताचा उपकर्णधार असलेला विराट कोहली सध्या क्रिकेट विश्वकरंडकामध्ये व्यस्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2015 रोजी प्रकाशित
अनुष्काने दिली ‘विराट’प्रेमाची कबुली
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतच्या मैत्रीमुळे गेले काही दिवस जास्त चर्चेत आहे.

First published on: 17-02-2015 at 03:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma admits to being in a relationship with indian cricketer virat kohli