News Flash

“तिचं पोट बघा,” म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अनुष्का शर्माचे जबरदस्त उत्तर; म्हणाली….

झरीन खानच्या मदतीला धावून आली अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा धावली झरीनच्या मदतीला

सोशल मिडियावर सेलिब्रिटीजला ट्रोल करण्याचे प्रमाण दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अगदी सेलिब्रिटींच्या कपड्यांपासून ते त्यांच्या दिसण्यापर्यंत आणि त्यांना केलेल्या ट्विटपासून ते त्यांच्या वक्तव्यांपर्यंत अनेक गोष्टींवरुन सेलिब्रिटीजला लक्ष्य केलं जातं. अनेकदा सेलिब्रिटीज या ट्रोलर्सकडे विशेष लक्ष देत नाहीत. तर कधीकधी ते जसाश तसे उत्तर देतात. अशावेळी एका अभिनेत्रीच्या मदतीला दुसरी अभिनेत्री धावून आल्याचे क्वचितच पहायला मिळतं. मात्र अभिनेत्री झरीन खानला ट्रोल करणाऱ्यांना अनुष्का शर्माने अगदी सपक उत्तर दिलं आहे.

नक्की काय घडलं?

झरीन खानने काही दिवसांपूर्वी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. राजस्थानमधील उदयपूर येथील जलमहालजवळ काढलेल्या या फोटोमध्ये झरीन पांढऱ्या टॉपमध्ये दिसत आहे. राजस्थान दौऱ्यातील एक आनंददायी क्षण झरीनने इन्स्टाग्रामवर शेअर केला.

मात्र या फोटोखालील कमेंटमध्ये अनेकांनी झरीनला ट्रोल केलं आहे. ‘तिच्या कंबरेवर असणारे व्रण बघा’, ‘तू आता म्हतारी झालीयस’, ‘काकू पोट छान आहे तुमचं’, ‘तिच्या बेंबीजवळ बघा’ अशा पद्धतीच्या कमेंट या फोटोखाली केल्या आहेत. झरीनने मागील वर्षभरामध्ये बरेच वजन कमी केले असून अनेकदा ती आपले जीममधील सेल्फीही सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्येही ती खूप सुंदर दिसत आहे. तरी अनेकांनी तिला तिच्या पोटावरील चरबीवरुन ट्रोल केलं आहे.

या ट्रोलर्सला उत्तर देण्याऐवजी झरीनने त्यांच्याकडे दूर्लक्ष केलं. तिने स्वत:चा आणखीन एक फोटो अपलोड केला आणि या फोटोबरोबर एका गाण्याचे शब्दही शेअर केले. त्यांच्यामुळे तुम्ही खालच्या थराला जाऊ नका आणि शांत राहिल्यास सर्व छान होईल असा या गाण्याचा आशय आहे.

अनुष्काची प्रतिक्रिया काय?

हा सर्व प्रकार पाहून अनुष्काने लगेचच झरीनसाठी एक छान पाठिंबा देणाऱ्या मेसेज आपल्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केला. “झरीन तू सुंदर, हिंमतवान आणि शक्तीशाली आहे. आहेस तशी खूप छान आहेस,” असं म्हणत अनुष्काने स्टोरीमध्ये झरीनला टॅग केलं आहे.

झरीननेही अनुष्काची स्टोरी शेअर करत तिचे आभार मानले आहेत.

अशाप्रकारे फोटोंवर ट्रोल करणाऱ्यांना अनेकला सेलिब्रिटी उत्तर देतात. मात्र अनुष्काने जे केलं तसं खूपच कमी वेळा पहायला मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 9:43 am

Web Title: anushka sharma gives it back to trollers who body shamed zareen khan for her stretch marks scsg 91
Next Stories
1 ‘टिक टॉक’च्या व्हिडीओवरून कंगनाने घेतला दीपिकाशी पंगा, म्हणाली…
2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसोबत पाहणार ‘तान्हाजी’
3 आयुषमान खुरानाने आणली समलिंगी लव्हस्टोरी
Just Now!
X