13 December 2017

News Flash

विराटच्या भेटीसाठी अनुष्का बंगळुरुला, फोटो व्हायरल

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या प्रेमाची चर्चा तशी

ऑनलाइन टीम | Updated: April 19, 2017 7:38 PM

विराट आणि अनुष्काचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या प्रेमाची चर्चा तशी नवी नाही. ही जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा या जोडीविषयी चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. नुकतीच अनुष्काने बंगळुरुमध्ये जाऊन विराट कोहलीची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे विराट सध्या आयपीएलच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएलमध्ये विराट कोहली बंगळुरु संघाचे नेतृत्व करतोय.

virat-anushka

आयपीएलमध्ये बंगळुरु संघाचे आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे विराट आतापर्यंत मैदानात उतरल्याचे दिसलेले नाही. त्याच्या अनुपस्थितीत बंगळुरु संघाच्या नेतृत्वाची धुरा शेन वॉटसनच्या खांद्यावर पडली आहे. आयपीएलच्या समाप्तीनंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ मीनी विश्वकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये उतरण्यापूर्वी विराट आयपीएलच्या मैदानात उतरावा, यासाठी क्रिकेट प्रेमींची उत्सुकता दिवसेंदिवस शिगेला पोहोचताना दिसतेय.

virat-anushka-1

विराट आणि अनुष्का यांचे फोटो व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. विराट बरेचदा सोशल मीडियावरून त्याच्या भावना व्यक्त करताना दिसला आहे. मात्र, अनुष्काने अजूनपर्यंत त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगणेच पसंत केले आहे. असे असले तरी या दोघांवरही माध्यमांच्या नजरा नेहमीच खिळलेल्या असतात. काही दिवसांपूर्वी ‘फिल्लौरी’च्या चित्रपटातून अनुष्का चर्चेत आली होती. तिच्या या चित्रपटामध्ये विराट कोहलीने पैसा गुंतवल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी माझ्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मी स्वत: सक्षम असल्याचे सांगत अनुष्काने या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

आयपीएल सामन्याच्या शुभारंभाच्या पूर्वीच अनुष्काचा ‘फिल्लौरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर अनुष्का आणि क्रिकेटच्या मैदानात विराट कोहली यांच्यावर नजरा खिळणार असल्याचे समीकरण जुळून येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या.  पण, विराट मैदानात उतरला नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. तर दुसरीकडे अनुष्काच्या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर म्हणावा तितका प्रतिसाद न मिळाल्याचे दिसते.

First Published on April 11, 2017 6:00 pm

Web Title: anushka sharma visits injured virat kohli in bangalore ipl10 see viral photos