22 September 2020

News Flash

आराध्याचा ‘हा’ निरागस फोटो होतोय व्हायरल

ऐश्वर्याने नुकताच आराध्याचा नुकताच एक फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळतंय.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी कमी होते त्यामुळे अनेक सेलिब्रेटीज सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असतात. चाहत्यांमधील हीच दरी कमी करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं.सोशल मीडियावर एक नवी सुरुवात करणाऱ्या ऐश्वर्याच्या पहिल्याच फोटाला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले होते. त्यानंतर आता इन्स्टाग्राम ऐशच्या सवयीचा भाग झाला असून ती रोज एक तरी फोटो अपलोड करत असते. त्यामुळे ऐश्वर्याने नुकताच आराध्याचा नुकताच एक फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळतंय.

एका चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त ऐश्वर्या पॅरिसला गेली असून तिथले काही फोटो ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहे. काही दिवसापूर्वी तीने आराध्याचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये आराध्या आई ऐश्वर्याला कॉपी करताना दिसत होती. हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणावर लाईक्सही मिळाले होते. त्यामुळे आता ऐश्वर्याने आराध्याचा पुन्हा एक फोटो शेअर केल्या असून हा फोटो पाहताच आराध्या आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

आराध्या

 

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये आराध्या सुप्रसिद्ध आयफेल टॉवरखाली उभी असून तिने मस्त पोझ दिली आहे. या फोटोला ऐश्वर्याने ‘माझी गोड परी’ असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोत आराध्याने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला असून तिने हातात फ्रॉकच्या फ्रिल्स पकडल्या आहेत. त्यामुळे आराध्याचा हा गोड फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, पॅरिसमध्ये असलेल्या ऐश्वर्याचा आगामी ‘फन्ने खां’ हा चित्रपट येत्या ३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून तिच्याबरोबर राजकुमार राव स्क्रिन शेअर करणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 10:34 am

Web Title: aradhya pic on isntagram posing infront of eiffel tower
Next Stories
1 बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांचं लक्ष वेधतोय ‘विरुष्का’चा सेल्फी
2 ..म्हणूनच माझ्यावर टीका होते- सनी लिओनी
3 ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार अक्षयकुमार-रजनीकांतचा ‘2.0’
Just Now!
X