News Flash

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा हॉट अंदाज, समुद्र किनाऱ्यावरील व्हिडीओ व्हायरल

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

arbaaz khan, arbaaz khan gf, arbaaz khan girlfriend, giorgia andriani, giorgia andriani video,
तिचा हा मोनोकिनीमधील लूक चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. ते एकत्र फिरताना आणि डिनर डेटला जाताना दिसतात. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. आता जॉर्जियाचा समुद्र किनाऱ्यावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती हॉट दिसत आहे.

जॉर्जियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ गोव्यामधील एका समुद्र किनाऱ्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये जॉर्जियाने मोनोकिनी परिधान केली असून ती अतिशय हॉट दिसत आहे. तसेच ती टोनी कक्करचे अतिशय लोकप्रिय गाणे ‘गोवा वाले बीच पे’ या गाण्यावर मजामस्ती करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एक लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

आणखी वाचा : ‘आर्यनने मुलींना डेट करावे, सेक्स करावा, ड्रग्ज घ्यावेत’, शाहरुख खानचे वक्तव्य पुन्हा चर्चेत

अरबाज खानने २०१९मध्ये एका मुलाखतीमध्ये जॉर्जियाला डेट करत असल्याचे मान्य केले होते. जॉर्जियाने ‘Karoline Kamakshi’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या सीरिजमध्ये काम करत तिने करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने मिका सिंगसोबत ‘तेरा मस्ताना’मध्ये काम केले आहे. ती लवकरच ‘वेलकम टू बजरंगपुर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे देखील दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 1:06 pm

Web Title: arbaaz khans girlfriend giorgia andriani goa beach video viral avb 95
Next Stories
1 जय भानुशालीने ‘तो’ फोटो शेअर केल्याने पत्नी माही नाराज, सोशल मीडियावर केलं ब्लॉक
2 ‘यासाठी’ तब्बल १८ लाख किमतीच्या सोफ्यावर बूट घालून उभी राहिली सोनम कपूर, पती आनंद म्हणाला….
3 यूट्यूबर कॅरी मिनाटी सापडला कायद्याच्या कचाट्यात? दिल्लीतील वकिलाने केला गुन्हा दाखल
Just Now!
X