17 January 2021

News Flash

‘दबंग ३’च्या माध्यमातून अरबाजच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

अरबाज-मलायकासाठी हा आनंदाचा क्षण आहे

मलायका अरोरा, अरबाज खान आणि अरहान

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याचे प्रत्यके चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे दबंग. काही वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे या चित्रपटाचा सिक्वलही प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिक्वल आल्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर त्याचा पुढील भाग दबंग ३ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांप्रमाणेच अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरासाठीही हा चित्रपट खास ठरणार आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा मुलगा अरहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

‘स्पॉटबॉय’च्या वृत्तानुसार, अरहान दबंग ३ च्या सहाय्यक दिग्दर्शक पदाची धुरा सांभाळणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभूदेवा दबंग ३ चं दिग्दर्शन करणार असून अरहान त्याला असिस्ट करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून खान कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.

येत्या एप्रिल महिन्यापासून दबंग ३ चं चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. ‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचंही म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 2:50 pm

Web Title: arbaaz khans son arhaan entering bollywood
Next Stories
1 #GlimpsesOfKesari : अविश्वसनीय शौर्यगाथेची पहिली झलक पाहिलीत का?
2 लग्नाच्या प्रश्नावर कतरिनाचं अजब उत्तर
3 सनीने साजरा केला मुलांचा पहिला वाढदिवस, निशाबद्दल म्हणते…
Just Now!
X