29 October 2020

News Flash

मलाईका आणि अर्जुन कपूर पुढच्या वर्षी विवाहबंधनात?

गेल्या काही वर्षांपासून हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांनी या नात्याची कबुली मात्र दिलेली नाही

मलायका अरोरा, अर्जुन कपूर

मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर या दोघांचाही मिलान एअरपोर्टवरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बातमी चर्चेत असतानाच हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे अशीही बातमी समोर येते आहे. आत्तापर्यंत या दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिलेली नाही. मात्र लवकरच या दोघांच्या विवाहाची घोषणा होऊ शकते अशी शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आम्ही चांगले मित्र आहोत असं म्हणून मलाइकाने हा विषय कायमच टाळला आहे.

दरम्यान खात्रीलायक वृत्तानुसार मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघेही पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. www.filmfare.com ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. नुकतेच अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या शोमध्ये हे दोघेही गेले होते. तिथे त्यांचा एकमेकांबद्दलचा अंदाज, एकमेकांबद्दलची केमिस्ट्री खूप काही सांगून गेली. या शोमध्ये ते एकमेकांबद्दल बोलत नव्हते मात्र ते एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत होते. आता आपले हेच नाते पुढे घेऊन जाण्यासाठी या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या दोघांच्या विवाहाची तारीख ठरली आणि त्यांचे शुभमंगल लागले तर आश्चर्य वाटायला नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2018 10:12 pm

Web Title: arjun kapoor and malaika arora to tie the knot next year
Next Stories
1 सासरा -जावई नाते उलगडणारी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
2 #MeToo ही फक्त माझी नाही पुढच्या पिढ्यांचीही लढाई – तनुश्री दत्ता
3 संगीतकार खय्यामजी यांना हृदयनाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार
Just Now!
X