News Flash

..तर अर्जुन कपूर झाला असता ‘कबीर सिंग’

मी शाहिदला दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा होता

दिग्दर्शक संदीप वांगा यांचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाणी हीट झाली आहेत. तसेच ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. आता चित्रपटातील शाहिदच्या मुख्य भूमिकेबाबत एक सत्य समोर आले आहे.

मुंबई मिररसह झालेल्या एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक संदीप वंंगाने ‘कबीर सिंग’ चित्रपटाबाबत काही गप्पा मारल्या. दरम्यान कबीर सिंग या चित्रपटासाठी अभिनेता अर्जुन कपूरला पहिली पसंती देण्यात आली होती का असा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘हो हे खरे आहे. पण मी आणि शाहिदने या चित्रपटाबाबत आधीच विचारविनिमय केला होता. म्हणून मी दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याचा विचार केला नाही. इथे कोणचा अभिनय चांगला आहे हे महत्वाचे नव्हते मी शाहिदला दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा होता’ असे उत्तर संदीप यांनी दिले.

‘कबीर सिंग’ या चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील कियाराच्या भूमिकेबाबत देखीस संदीप यांना काही प्रश्न विचारण्यात आले. ‘कियारा प्रत्येक भूमिकेला न्याय मिळवून देते’ असे संदीप म्हणाले.

याआधी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये अर्जुन रेड्डीची मुख्य भूमिका साकारणारा विजय देवरकोंडा आणि कबीर सिंगच्या लूकमधील शाहिद कपूर हुबेहूब दिसत आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच कॉलेजमध्ये शिकत असताना शाहिद कियारा उर्फ प्रीतीच्या प्रेमात पडतो. परंतु प्रेयसी सोडून गेल्यानंतर व्यसनाधीन झालेल्या अँग्री यंग मॅन, कबीर सिंगची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता आणि आता ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली आहे.हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:13 pm

Web Title: arjun kapoor was producers first choice for kabir singh
Next Stories
1 बीग बींच्या लव्हस्टोरीची ४६ वर्षे
2 Video : भरधाव वेगात बाईक चालविणाऱ्या रोहित शेट्टीचा व्हिडिओ पाहिलात का ?
3 …अन् सलमानसाठी वडिलांनी भोगली उन्हात उभं राहण्याची शिक्षा
Just Now!
X