News Flash

अर्जुन रामपाल अडचणीत, कंपनीने केली फसवणूकीची तक्रार

पैसे परत देऊ शकला नाही

अर्जुन रामपाल, arjun rampal

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल अडचणीत सापडला आहे. कंपनीचे पैसे परत न केल्यामुळे त्याच्याविरोधात फसवणूकीची तक्रार केली आहे. वाय एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जुनने १२ टक्के व्याजावर आपल्याकडून एक कोटी रूपये घेतले होते. ९० दिवसांमध्ये सर्व पैसे परत करण्याच्या अटीवर पैसे दिले होते. मात्र अद्याप अर्जुनने परफेड केली नसल्याचा आरोप वाय इंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने केला आहे.

९ मे २०१८ रोजी अर्जुन रामपालने एक कोटी रूपये व्याजाने घेतले होते. ९० दिवसांच्या आत व्याजासहीत ते सर्व पैसे परत देण्याचा करार कंपनीसोबत झाला होता. मात्र मुदत संपूनही अर्जुनने ते पैसे परत केले नाहीत. त्यानंतर अर्जुनने कंपनीला एक चेक दिला होता तो देखील बाऊन्स झाला. त्यामुळे कंपनीने अर्जुनविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. नेगोशिएबल इंस्‍ट्रुमेंट्स अॅक्‍ट अंतर्गत अर्जुनविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 10:32 am

Web Title: arjun rampal slapped with a criminal case
Next Stories
1 सिध्दार्थचे सामाजिक भान, बीडच्या अनाथ मुलांना केली आर्थिक मदत
2 कतरिना म्हणतेय, गेल्या दहा वर्षांत एकानंही मला डेटसाठी विचारलं नाही
3 पॅडेड की पुशअप: हंगामा प्लेची पहिली मराठी विनोदी वेब-सीरिज तुम्हाला खुश करेल
Just Now!
X