24 November 2020

News Flash

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडची पुन्हा होणार चौकशी?

गॅब्रीएला डेमेट्रीएड्सची पुन्हा चौकशी होणार का?

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्स यांची अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) चौकशी केली. यात सलग दोन दिवस गॅब्रीएलाची ११ तास चौकशी करण्यात आली. मात्र, अद्यापही कोणती क्लीन चीट मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तिला चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाचा तपास सुरु असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींची नाव उघड झाली असून यात अभिनेता अर्जुन रामपाल व गॅब्रीएला डेमेट्रीएड्स यांचं नावदेखील समोर आलं आहे. यात दोघांची कसून चौकशी करण्यात आली.

आतापर्यंत गॅब्रीएलाच्या झालेल्या चौकशीमध्ये कोणतीच क्लीन चीट मिळाली नाही. त्यामुळे तिच्या मोबाईलमधील पूर्वीचे कॉल डिटेल्स व संभाषणाबाबतचा डाटा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणूनच, आवश्यकतेनुसार, गॅब्रीएलाला पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर रहावं लागेल, असं एनसीबीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे.

गेल्या महिन्यात एनसीबीने गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केले होते. अमली पदार्थाचे सेवन, अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क आणि बॉलिवूडशी संबंधित व्यक्तींना अमली पदार्थाचा पुरवठा असा आरोप एनसीबीने त्याच्यावर ठेवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 9:35 am

Web Title: arjun rampals girlfriend gabriella demetriades again inquiry ssj 93
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे बिग बींना वाटते ATM कार्ड वापरण्याची भीती
2 चित्र रंजन : ‘मंगल’ पण भारी नाही!
3 सावळ्या रंगामुळे चित्रांगदाने काम गमावलं, गुलजार यांनी केली अशी मदत
Just Now!
X