News Flash

..हे केवळ रणवीरलाच जमू शकते

रणवीर कुठेही गेला आणि तिथे ड्रामा होणार नाही असे होईल का?

बॉलीवूडचा खट्याळ अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री वाणी कपूर यांचा 'बेफिक्रे' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

बॉलीवूडचा खट्याळ अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री वाणी कपूर यांचा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रिमियर नुकताच १३व्या दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (डीफ) झाला. या प्रिमियरसाठी रणवीर आणि वाणी यांनीही उपस्थिती लावली होती. रणवीर कुठेही गेला आणि तिथे ड्रामा होणार नाही असे होईल का? पारंपारिक पोशाख केफ्फिये परिधान करण्यापासून ते अरेबिक गाण्यावर नाचण्यापर्यंत रणवीरने सर्व काही केले.

रवणवीरचा उत्साह तर सर्वांनाच माहित आहे. पण, यावेळी त्याने नक्की काय परिधान केले होते ते त्याला तरी कळले का? असा प्रश्नच पडला आहे. चंदेरी रंगाचा सूट त्यावर केफ्फिये आणि दुसरीकडे केशरी रंगाच्या सूटवर केप? नक्की हा कशाप्रकारचा पोशाख होता ते त्यालाच माहित. याबाबत रणवीर लिहतो की, दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी मी परिधान केलेला पोशाख. त्यावर त्याने #DIFF16 #TWEET360 हे हॅशटॅगही दिले आहेत.

दरम्यान, रणवीरने एका स्थानिक वाहिनीने आयोजित केलेल्या चॅट शोलाही उपस्थिती लावली होती.

दुबईतील रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा फोटो

१३व्या दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (डीफ) ‘बेफिक्रे’चा प्रिमियर सुरु होण्यापूर्वी रणवीर सिंग आणि वाणी कपूरची प्रतिक्रिया

१३व्या दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (डीफ) बॉलीवूडच्या एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री रेखा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, चित्रपटाच्या शिर्षकाचा मराठीत अर्थ काढायचा झाल्यास परवा न करणारी जोडी या चित्रपटात पाहायला मिळेल असे वाटते. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रणवीरने चुंबन दृष्यांवर कोणतीही परवा न करता वक्तव्य केल्यानंतर वाणी कपूर मागे राहिलं तर नवल. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वाणी कपूरने ‘बेफिक्रे’तील चुंबन दृष्यावर बिनधास्त अंदाजात उत्तर दिले आहे. चित्रपटाच्या कथानकातील चुंबनदृष्याचा सीन साकारणे पहिल्यांदा फारच कठिण होते. मात्र आता या चित्रपटाने रणवीरचे चुंबन घेण्याची सवय झाली आहे. मला कोणत्याही वेळी रणवीरचे चुंबन घेण्यास सांगितले तर मी सहज त्याचे चुंबन घेईन, असे तिने म्हटले आहे. ‘बेफिक्रे’ चित्रपटातील चुंबनदृष्यांच्या आकड्यावर बोलताना ती म्हणाली की, चुंबन घेताना कोण मोजमाप करत नाही.रणवीरसोबतच्या चुंबनदृष्याचा अनुभव कथन करताना वाणीने चुंबन दृष्ये ही मिठी मारल्यासारखीच असतात असे म्हटले आहे. एखाद्याला मिठीमध्ये घेताना तुमच्या डोक्यात आकड्यांचा खेळ नसतो. तसेच यावेळी अवघडल्यासारखे देखील वाटत नाही, अगदी तसाच अनुभव रणवीरसोबत चुंबदृष्य देताना आला, असे वाणीने म्हटले. यापूर्वी आपल्या खोडकर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या रणवीरने चुंबन दृष्याबाबत अजब प्रतिक्रिया दिली होती. रणवीर म्हणालेला की, अशी दृश्य करण्यासाठी बरीच मेहनत लागते. माझे शोषण झाले आहे. तसेच, आपण कोणालाही भेटवस्तू देण्यावर विश्वास ठेवत नाही. मी सिंधी असल्यामुळे मला वस्तू जपून ठेवायला आवडतात, असेही त्याने म्हटलेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 11:24 am

Web Title: as befikre premiere at diff ranveer singh promotes the film the way only he can see pics videos
Next Stories
1 फेब्रुवारीत रंगणार चित्रपटांचा महोत्सव!
2 तिसरी गोष्ट: १२ मार्च १९९३ मुंबई बॉम्बस्फोट
3 प्रशांत दामले सांगणार भविष्यवाणी!
Just Now!
X