News Flash

‘सिटी ऑफ ड्रिम्स २’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहायला मिळणार सत्तेसाठी बाप-मुलीत सुरु असणारा लढा

गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक 'सिटी ऑफ ड्रिम्स २' ची प्रतिक्षा करत आहेत.

पाहायला मिळणार सत्तेसाठी बाप-मुलीत सुरु असणारा लढा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटची ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ ही गाजलेली वेब सीरिज आहे. या सीरिजचा आता दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला सीझन हा दमदार अभिनय आणि राजकीय नाट्यामुळे प्रचंड गाजला होता. त्यानंतर प्रेक्षक हे दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांचा आनंद हा शिगेला पोहोचला आहे.

‘सिटी ऑफ ड्रिम’च्या ट्रेलरमध्ये बाप आणि मुलीत सुरु असलेला लढा पाहायला मिळणार आहे. अमेय राव गायकवाड जिंकणार की पोर्णिमा गायकवाड यांच्यात होणाऱ्या लढा दाखवण्यात येणार आहे. तर, सत्तेपुढे नाती कशी छोटी होतात हे आपल्याला त्याता पाहायला मिळणार आहे. एखादा राजकारणी सत्तेच्या लालसेपोटी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो आणि त्याची मुलगी त्याला कशी जोरदार टक्कर देते, हे या सीरीजमध्ये दाखवलं जाणार आहे. निवडणुकीच्या तयारीत असताना बाप आणि मुलगी अनेकांचे प्राण धोक्यात घालतात. पोर्णिमा महाराष्ट्राची तात्पुरती मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र जन शक्ती पक्षाची प्रमुख असल्याचे दिसते. पोर्णिमाला वसीम खान आणि माझी प्रदेश प्रमुख जगदीश गुरव मदत करतात.

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

आणखी वाचा : गर्भवती असल्याच्या चर्चांवर सोनम कपूरने सोडलं मौन

या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे सिटी ऑफ ड्रिमचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन नागेश कुन्नूर यांनी केले आहे. तर रोहित बनवलीकर आणि आणि नागेश कुकनूर यांनी सहलेखन केले होते. ही सीरिज ३० जुलैला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 3:16 pm

Web Title: atul kulkarni and priya bapat s city of dreams season 2 trailer released dcp 98
टॅग : Entertainment News
Next Stories
1 “एकदा तरी स्वतः…” सिद्धार्थ चांदेकरची ‘ही’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
2 रसिका सुनीलचा बॉयफ्रेंडसोबतचा ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल
3 “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”
Just Now!
X